माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तब्येत बिघडली, ठाण्याच्या रुग्णालयात केले दाखल

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील अक्रीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अद्याप काही अंशी ती गंभीर असल्याचे समजते.