भाजप सरकारने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले. आता लोकांपासून निवडणुकीची माहिती लपवण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सार्वजनिक करणे टाळण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये बदल करण्यात आले. भाजप सरकारचा हा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. नियोजित पद्धतीने कटकारस्थान रचून आयोगाची अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज हल्ला चढवला.