चीनचे प्रसिद्ध ऍप टिकटॉकवर आता अल्बानियातही बंदी; हे ऍप छोटी मुले आणि समाजासाठी धोकादायक

चीनमधील प्रसिद्ध सोशल मीडिया ऍप टिकटॉकवर आता अल्बानिया देशातही बंदी घालण्यात आली आहे. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी यासंबंधी माहिती दिली असून टिकटॉक हे पाहण्याजोगे ऍप नाही. यावर अश्लील आणि चुकीची माहिती प्रसारित केली जाते. हे छोटे मुले आणि समाजासाठी धोकादायक आहे. अल्बानियात कमीत कमी एक वर्ष म्हणजे 2025 पर्यंत बंदी असेल असे ते यावेळी म्हणाले. हिंदुस्थानात 2020 मध्ये टिकटॉकसह 58 ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान, इराण, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, यूके, कॅनडा, न्यूझीलंड, तायवान, फ्रान्स, बेल्जियम, माल्टा, नार्वे या देशांनीही टिकटॉकवर बंदी घातली आहे.