गुजरातच्या सुरत ते बँकॉक या दोन शहराचा विमान प्रवास करताना विमान प्रवाशांनी तब्बल 15 लिटर दारू प्यायल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात जवळपास 300 प्रवासी होते. चार तासांच्या विमान प्रवासात या प्रवाशांनी 15 लिटर दारू म्हणजेच जवळपास 1.8 लाख रुपयांची दारू प्यायली असे गुजरातमधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने बातमी दिली आहे.
प्रवाशांनी दारूसोबत खमन आणि थेपला या गुजराती स्नॅक्सवरसुद्धा त्यांनी ताव मारला. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओत प्रवाशांनी दारूच्या रिकाम्या बाटल्या धरून ठेवलेल्या दिसत आहेत. या घटनेसंबंधी विमान प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. गुजरातमध्ये दारूबंदी असताना विमानात दारू कशी काय मिळाली तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळय़ा कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, प्रति व्यक्ती केवळ 50 मिलीलिटर म्हणजेच प्रति व्यक्ती दोन पेग. त्यामुळे हे शक्य आहे, परंतु यात एवढी आदळआपट करण्यासारखे काय आहे असे म्हटले.