तामीळनाडूमधील रामनाथपुरम येथील एका बेकरीने अनोखा केक तयार करून उद्योगपती रतन टाटा यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली. या बेकरीने ख्रिसमसनिमित्त 7 फूट उंचीचा केक तयार केला आहे. या केक मध्ये रतन टाटा यांचे लाडके श्वान आहे. टाटा आणि त्यांचे श्वानाबद्दल असलेले प्रेम दर्शवणारा केक तयार करण्यात आला आहे. ऐश्वर्या नावाची बेकरी दरवर्षी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वासाठी खास केक बनवते. या वर्षी त्यांनी केकची थीम म्हणून दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची निवड केली आहे. हा केक 60 किलो साखर आणि 250 अंडी घालून बनवण्यात आला. हा केक सध्या ख्रिसमस सणानिमित्त लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी अनेक जण गर्दी करत असून विद्यार्थी केकसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.