राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांचे कुटुंबिय बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आम्हांला तुमच्याशी बोलायचे आहे, अशी विनंती गावातील महिलांनी केली. त्यावेळी अजित पवार पळत गाडीकडे गेले. राज्यातील उपमुख्यमंत्री सांत्वन भेटीसाठी येतो, तेव्हा तो पळत जात नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी येथे येत गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. या गंभीर घटनेबाबत ते काहीही बोलले नाहीत. तसेच जनतेशीही त्यांनी संवाद साधला नाही. ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी अजित पवार यांनी पळ काढला.