शिवसेनेची क्रांतीचौकात तीव्र निदर्शने, अमित शाह राजीनामा द्या, धिक्कार असो, धिक्कार असो… घोषणांनी परिसर दुमदुमला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा क्रांतीचौकात शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. अमित शाह राजीनामा द्या, बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, हाय हाय अमित शाह हाय हाय…’ अशा निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी करत भाजपने आणि अमित शाह यांनी जाहीर माफी मागावी, अशी भावना व्यक्त केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मराठवाडा सचिव अॅड. अशोक पटवर्धन, राज्य संघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदकुमार घोडेले.

सुदाम सोनवणे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, हिरालाल सलामपुरे, श्रीरंग आमटे पाटील, विजय वाघमारे, बाळासाहेब कारले, राजू इंगळे, माजी नगरसेवक सचिन खैरे, सुरेश गायके, अशोक खेत्रे, विशाल खंडागळे, कृष्णा मेटे, बाबुलाल बिजरणे, अशोक शिंपी, नितीन पवार, पप्पू व्यास, प्रमोद ठेंगडे पाटील, सचिन तायडे, कान्हुलाल चक्रनारायण, शेख रब्बानी, बाळू गडवे, बापू कवळे, राजू खंडागळे, अक्षय दांडगे, लक्ष्मण लाड, संतोष जाटवे, नारायण जाधव, दिनेश तिवारी, सुनील कडवे, संजय मुरादे, विजय सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, भगवान आहेरकर, ज्ञानेश्वर मगर, किरण गणोरे, नागेश थोरात, युवासेनेचे अजय चोपडे, देविदास पवार, बबिता रानयेवले, अजय मोरे, गणेश चव्हाण, प्रसाद खांडेकर, महिला आघाडीच्या आशा दातार, सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, शिला गुंजाळ, दुर्गा भाटी, अनिता पाटील, प्रा. मनीषा बिराजदार, मीना फसाटे, वैशाली आराट, सीमा चक्रनारायण, अॅड. अंजना गवई, संगीता नरवडे, प्रतिभा राजपूत, रोहिणी काळे, लता संकपाळ, सुचिता आंबेकर, कल्पना मुळे, रंजना आहेर, संध्या कोल्हे, मंगल डोंगरे, बबिता रानयेवले, छाया देवराज, जयंती चौधरी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.