मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचे मोलाचे योगदान आहे. मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरच त्यांना घरे मिळायला हवीत, अशी आग्रही मागणी शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत केली.
मुंबई विकास नियमावली कायद्यानुसार, एनटीसी किंवा खासगी गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना किमान 405 चौरस फुटांचे क्षेत्रफळ मिळावे अशी भावना कामगारांमध्ये आहे. त्याचबरोबर गिरण्यांच्या जागेवरील चाळी आणि झोपडीधारकांनाही पुनर्विकासाचा लाभ मिळाला पाहिजे, असे सचिन अहिर यांनी सभागृहात सांगितले.
गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळाले पाहिजेच तसेच मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) कामगारांसाठी बांधण्यात येणाऱया घरांच्या किमतीही कमी कराव्यात, अशीही मागणी सचिन अहिर यांनी केली.