डल्लेवाल यांना तत्काळ तात्पुरत्या रुग्णालयात हलवा, सुप्रीम कोर्टाने सलग तिसऱ्या दिवशी पंजाब सरकारला फैलावर घेतले

शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी खनौरी बॉर्डरवर तब्बल 25 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तत्काळ जवळच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्याचे निर्देश पंजाब सरकारला दिले आहे.

डल्लेवाल यांची शारीरिक तपासणी केली आहे. रक्ताच्या नमुन्यांवर 20 चाचण्या केल्याचे महाधिवक्त्यांनी रुग्णालयाला सांगितले. तसेच न्यायालयाने वैद्यकीय अहवालाबाबत विचारले असता युरिक अ‍ॅसिड वाढले असून औषधोपचाराची गरज आहे, परंतु त्यांनी उपचास नकार दिल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने डल्लेवाल यांच्या प्रकृतीची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. शेतकऱ्यांचे हीत त्यांच्याशी जोडले असल्याचा पुनरुच्चार करत सरकारला फैलावर घेतले.