एअर इंडियाकडून पायलटच्या ट्रेनिंगसाठी 34 विमानांची खरेदी

एअर इंडियाच्या नवीन पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी कंपनीने अमेरिकेकडून पायपर एअरक्राफ्टच्या 34 विमानांची खरेदी केली. यात 31 सिंगल इंजिन विमान आणि ऑस्ट्रियाच्या डायमंड एअरक्राफ्टचे 3 डबल इंजिन विमानाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण विमान आधुनिक ग्लास कॉकपिट, जी 1000 एविओनिक्स सिस्टम आणि जेट ए 1 इंजिनचे आहेत. या विमानाद्वारे एअर इंडिया फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायजेशन (एफटीओ) मध्ये कॅडेट पायलटला प्रशिक्षण देणार आहे.