करिना-शाहीद कपूर पुन्हा एकत्र दिसले

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता शाहीद कपूर अनेक वर्षांनंतर एकत्र दिसले. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाला हे दोघे उपस्थित होते. विशेष म्हणजे करिनाच्या मागच्या रांगेत शाहीद त्याच्या पत्नीसोबत खुर्चीवर बसला होता. करिनाच्या मागे बसल्यामुळे फोटोग्राफर्सने त्यांचा एकत्र बसलेला फोटो क्लिक केला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.