अयोध्येतील राम मंदिरात अँड्रॉईड फोनवर बंदी, आयफोनला सूट

अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात नुकतीच नव्या पुजाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली. पुजाऱ्यांसाठी काही कडक नियम करण्यात आले आहेत. राम मंदिरात अँड्रॉईड फोनच्या वापरावर बंदी आणली आहे, परंतु आयफोन वापरावर बंदी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लवकरच पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड लावण्याची तयारी सुरू आहे. जेव्हा बंदीचा विषय येतो तेव्हा आयफोनऐवजी अँड्रॉईडवर पहिल्यांदा बंदी लावली जाते.  आयफोनला मात्र सूट दिली जाते, असे का ते जाणून घेऊ या.

सॉफ्टवेअर अपडेट

ऍपल आपल्या सर्व डिवाईससाठी नियमित आणि दीर्घकाळपासून अपडेट देत आहे. जेणेकरून जुने आयफोनदेखील नव्या सिक्युरिटी फीचरचा लाभ घेऊ शकतील आणि सुरक्षित राहतील.

अँड्रॉईड – अँड्रॉईड जुन्या फोनमध्ये अनेकदा अपडेट मिळत नाहीत. त्यामुळे सिक्युरिटी धोका वाढतो.   याउलट ऍपल कंपनी आपल्या आयफोनमध्ये वेळोवेळी अपडेट

ऑपरेटिंग सिस्टिम

आयफोन – आयओएस एक क्लोज सिस्टिम आहे. केवळ ऍप स्टोरवरूनच त्याला डाऊनलोड करता येऊ शकते. ऍपल सर्व ऍप्सची कडक तपासणी करते. त्यामुळे मेलवेयरचा धोका कमी असतो.

अँड्रॉईड – अँड्रॉईड हे एक ओपन सोर्स सिस्टिम आहे. युजर्सला ऍप्स इन्स्टॉल करण्याची सुविधा असते. त्यामुळे मेलवेयर, व्हायरसचा धोका वाढतो.

डेटा एक्रीप्शन-प्रायव्हसी

आयफोन डिफॉल्ट रूपात डेटा एक्रीप्ट करतो. ऍपलने गोपनीयतेला प्राधान्य देत ट्रकिंग मर्यादित करण्याच्या दृष्टीने फीचर दिले आहेत. उदाहरणार्थ, ऍप ट्रकिंग ट्रान्पेरन्सी. अँड्रॉईडदेखील डेटा एक्रीप्शन देते. मात्र हे फीचर फोन निर्माता आणि अँड्रॉईड वर्जनवर अवलंबून असते. गुगल डेटा कलेक्शनमुळे  गोपनीयतेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात.