लग्नाचा खर्च ‘आयटी’च्या रडारवर, वारेमाप खर्च करणाऱ्या जोडप्यांना मधुचंद्राऐवजी कार्यालयात चकरा माराव्या लागतील

प्राप्तिकर विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकले असून पुढील काही दिवस कारवाई सुरू राहणार आहे. या छाप्यांदरम्यान, इन्कम टॅक्स विभाग रोखीने केलेले व्यवहार शोधून काढणार आहे. ही चौकशी परदेशात सुंदर ठिकाणी आयोजित डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत पोहोचू शकते. ज्यामध्ये पाहुणे आणि तारेतारका आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक करण्यात आली होती.  केटरिंग कंपन्यांचीही चौकशी केली जात आहे. लग्नकार्यात कोणत्या गोष्टींवर सर्वात जास्त खर्च करण्यात आला, याची चौफेर चौकशी करण्यात येत आहे.

हिंदुस्थानात सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. अनेक जण विवाह सोहळा म्हटलं की, पैसे खर्च करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांत देशातील विविध शहरांमध्ये झालेले भव्यदिव्य विवाह सोहळे आणि ज्या विवाहांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत, ते आता आयकर विभागाच्या रडारवर आले असून डेस्टिनेशन वेडिंग आणि सेलिब्रिटी उपस्थिती असलेल्या लग्नांवर अधिक लक्ष दिले जात आहे.

आयकर विभाग जयपूरच्या 20 वेडिंग प्लॅनर्सवर छापेमारी करत असून गेल्या एका वर्षात भव्य विवाह सोहळ्यावर 7,500 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड खर्च करण्यात आली असून या पैशांचा कोणताही हिशेब नाही, अशी भीती प्राप्तिकर विभागाला आहे. त्याच वेळी संशयास्पद एन्ट्री ऑपरेटर, हवाला एजंट आणि खेचर खाती चालवणारे जे बनावट बिले तयार करतात ते हैदराबाद व बंगळुरू येथील भागीदारांच्या सहकार्याने हा व्यवसाय करतात. जे श्रीमंतांच्या घरात आयोजित भव्य विवाहांच्या आधारे भरभराटीला येत आहेत. लग्नात कोणत्या कामांसाठी किती खर्च केला. याची पडताळणी आयकर किभागाकडून केली जात आहे. लग्नावर करण्यात आलेल्या खर्चाचा हिशोब न देणाऱ्या कधू-करावडील मंडळी गोत्यात येऊ शकतात.