जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मिरवणाऱ्या बलाढय़ अमेरिकेवर शटडाऊनची टांगती तलवार उभी आहे. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेतील राजकीय तज्ञ आणि सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या जेम्स डेव्हिड वेंस या दोघांनीही अमेरिकेत शटडाऊन करण्याची मागणी केली, परंतु हे विधेयक अमेरिकन संसदेत मंजूर होऊ शकले नाही. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने अध्यक्ष-निर्वाचित ट्रम्प यांची फेडरल ऑपरेशन्सला निधी देण्याची, कर्ज मर्यादा वाढवण्याची किंवा निलंबित करण्याची सरकारी शटडाऊनच्या एक दिवस आधी योजना नाकारली आहे. यूएस संसदेच्या कनिष्ठ सभागृहात रिपब्लिकन पक्षाने आणलेले खर्च विधेयक नाकारले, जे सरकारी शटडाऊन टाळण्यासाठी तात्पुरता उपाय प्रदान करणार होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत शटडाऊन थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर अमेरिकन सरकारसमोर मोठे संकट उभे राहील. संसदेत हे विधेयक कनिष्ठ सभागृहात 174 च्या तुलनेत 235 मतांनी फेटाळले गेले.
सरकारी शटडाऊन म्हणजे काय?
अत्यावश्यक खर्चासाठी जेव्हा फेडरल सरकारकडे निधी संपतो तेव्हा सरकारी शटडाऊन होते. अशा परिस्थितीत यूएस काँग्रेसने शुक्रवारी रात्रीपर्यंत निधीचे विधेयक मंजूर केले नाही, तर देशभरातील सर्व सरकारी सेवांवर व्यापक परिणाम होईल. याव्यतिरिक्त अंदाजे दोन दशलक्ष फेडरल कर्मचाऱ्यांचे पगार थकतील, तर परिवहन सुरक्षा प्रशासननेदेखील सुट्टीच्या काळात हवाई प्रवास प्रभावित होण्याचा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांचा पाठिंबा, पण विधेयक नाकारले
येत्या काही दिवसांत राष्ट्रपतीपदाची शपथ घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कर्ज मर्यादा स्थगित करण्याचा आग्रह धरला. 8 ट्रिलियन डॉलर कर कपात करण्यासह महत्त्वपूर्ण कर कपात करण्यास मदत करेल असा त्यांनी युक्तिवाद केला, पण यामुळे राष्ट्रीय कर्ज आणखी वाढेल, जे सध्या 36 ट्रिलियन डॉलर आहे.