शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या घराची आणि दै. सामना कार्यालयाची अज्ञात व्यक्तींनी रेकी केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी आज विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित केला.
भास्कर जाधव यांनी आज विधीमंडळात सांगितले की, या सदनाचे सदस्य सुनील राऊत यांच्या घरासमोर आज सकाळी मोटरसायकलवरून दोन तरुण आले. त्यांनी आपले चेहरे झाकले होते. या दोघांनी राऊत यांच्या घराची रेकी केली. तेव्हा मीडियातल्या दोन लोकांनी विचारलं तुम्ही कोण? या तरुणांकडे 10 मोबाईल फोन होते अशी माहितीही जाधव यांनी दिली.
आज शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमरास ही रेकी झाली. रेकीसाठी वापरलेली गाडी ही उत्तर प्रदेश किंवा बिहारमधली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या तरुणांचा शोध सुरू आहे.