महाडच्या सणसवाडी जवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी बसला भीषण अपघा झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
सदर बस पुण्याहून बिरवाडी (महाड) ला जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये 40 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस आणि बाचवपथक घटनास्थळी पोहोचले. जखमी झालेल्यांना माणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.