खिसमसच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील नेक्सस सीवूड्स मॉल आणि एआयईएसईसी इन सहकार्याने ‘ख्रिसमस फ्ली’ हा रंगीबेरंगी कार्यक्रम २४ ते २९ डिसेंबरदरम्यान सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित केला आहे. जगभर प्रसिद्ध असलेल्या एआयईएसईसी या युवा संघटनेद्वारे सादर करण्यात येणारा हा आठवडाभराचा उत्सव खरेदी, खाद्यपदार्थ, मनोरंजन आणि उत्साही कार्यशाळांनी भरलेला असेल. या उत्सवाचे माध्यम प्रायोजक दैनिक ‘सामना’ आहे.
सहभागी नागरिकांना विविध प्रकारच्या स्टॉल्समधून हँडक्राफ्ट गिफ्टस्, खास ख्रिसमस वस्तू, आकर्षक कपडे, घर सजावटीचे साहित्य आणि अॅक्सेसरीज शोधण्याची संधी मिळेल. सणाच्या खरेदीसाठी आणि नवीन वर्षाची तयारी करण्यासाठी हा उत्सव उत्तम ठरणार आहे. लहान मुलांसाठी सांता कॉर्नर, खाद्यप्रेमींसाठी खास पारंपरिक ख्रिसमस पदार्थ, जागतिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एक विशेष गोरमेट फूड कोर्ट तयार केले आहे. लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्सेस आणि करोल गायन युवा वर्गासाठी आकर्षण ठरणार आहे.
आनंददायी आठवडा
‘ख्रिसमस फ्ली’ फक्त खरेदीचा कार्यक्रम नसून तो एक समुदाय, आनंद, आणि सण साजरा करण्याचा उत्सव आहे. कुटुंब आणि मित्रांसाठी आम्ही हा आनंददायी आठवडा आयोजित करत आहोत याचा आम्हाला खूप आनंद असल्याची माहिती एआयईएसईसीच्या टीमने दिली.