राम मंदिर बांधले म्हणजे हिंदूंचा नेता होता येत नाही!

हिंदू हा अनादी- काळापासून सर्वांसोबत मिळून मिसळून राहतो आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर राखला पाहिजे. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले राममंदिर बांधले म्हणजे हिंदूंचा नेता होता येते असे नाही. भूतकाळाच्या ओझ्यामुळे तिरस्कार, शत्रुता आणि संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढूनही चालणार नाही, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंदुस्थानने विश्वगुरू व्हावे असे वाटत असेल तर फुटीरतेची भाषा विसरली पाहिजे, असेही ते म्हणाले.