कब तक सहे एक अपमान हम… भुजबळांचे अजित पवार गट सोडण्याचे संकेत

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांचा बंडाचा पवित्रा कायम आहे. ‘कब तक सहे एक अपमान हम…’ असा शेर ऐकवत भुजबळ यांनी सहकाऱयांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असे त्यांनी आज सांगितले.

नाशिकच्या मेळाव्यात काहीजण विरोधी पक्ष पाहा म्हणाले, काहींनी स्वतंत्र पक्ष काढा म्हटले तर बरेच जण भाजपात जा म्हणत होते. माझे इतर सहकारीही आहेत. ते भेट घेत आहेत. ओबीसी संघटनेत काम करणारे अनेक नेते, पदाधिकारी आहेत त्या सर्वांशी चर्चा करून मी पुढचा निर्णय घेणार आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

जब पानी सर के उपर चढ जाता हैं

‘कब तक सहे एक अपमान हम, सुनते सुनते दिल ही थक जाता हैं, जब वार हो स्वाभिमान पर हर बार, तो सब्र का अंत हो जाता हैं. चूप रह कर क्या मिलता हैं आखिर, दिल का दर्द ही बढता हैं. और फीर उठानी पडती हैं आवाज, जब पानी सर के उपर चढ जाता हैं,’ अशा शेरमधून भुजबळ यांनी अजित पवार गट सोडण्याचे संकेत दिले.