येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू होणार आहे. 45 दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यात देशविदेशातून 40 कोटी भाविक सहभागी होतील. उत्तर मध्य रेल्वेने हायटेक सुविधांची तयारी सुरू केलीय. या अंतर्गत गुजरात-महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी त्यांच्या मातृभाषेत उद्घोषणा केल्या जातील. हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, गुजराती अशा विविध 12 प्रादेशिक भाषांमध्ये रेल्वेची उद्घोषणा ऐकता येतील.