स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरू करण्यात आली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांची 13,735 पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे. या पदांसाठी 17 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली असून 7 जानेवारी 2025 ही अखेरची डेडलाइन आहे. या भरतीची प्राथमिक परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे, तर मुख्य परीक्षा मार्च/एप्रिलमध्ये होईल. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर देण्यात आली आहे.