उत्तर कोरियातील हिंदुस्थानचे दूतावास पुन्हा एकदा सुरू होणार आहे. 2021 मध्ये कोरोना काळात ते बंद करण्यात आले होते. हिंदुस्थानचे पथक काही कर्मचाऱ्यांसह कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे पोहोचले आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद असलेले दूतावास पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हिंदुस्थानकडून हालचाली सुरू आहेत. अतुल मल्हारी गोतसुर्वे यांची मंगोलियामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.