बीडमध्ये दोन समाजातला दुरावा महाराष्ट्रासाठी चांगला नाही, शरद पवार यांचे विधान

बीडमध्ये दोन समाजात कटुता निर्माण झाली आहे, ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे असे शरद पवार म्हणाले. तसेच बीडमध्ये दोन समाजातला दुरावा महाराष्ट्रासाठी चांगला नाही असेही पवार म्हणाले.

दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, बीडमध्ये दोन समाजात कटुता निर्माण झाली आहे, ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे. बीडमध्ये एका सरपंचाची हत्या झाली, या घटनेच्या आधीपासून अशी परिस्थिती आहे. बीडमध्ये दुर्दैवाने दोन समाजांध्ये अंतर आहे. हे अंतर इतकं गंभीर आहे की एका समाजाचा व्यक्ती दुसऱ्या समाजाच्या हातचा चहासुद्धा घेत नाही. दोन समाजातला हा दुरावा महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगला नाही. मी बीडमध्ये जाणार होतो दोन समाजात कटुता कशी कमी होईल, एकवाक्यता कशी येईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही पवार यांनी नमूद केले.