आंबेडकर हयात असते तर त्यांच्यावरही अमित शहांनी ED, CBI ची कारवाई केली असती – संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील भाषणात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सध्या देशभरात आंदोलनं होत आहेत. संसदेत देखील इंडिया आघाडीने जोरदार निदर्शनं करत अमित शहा यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी केली. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

महामानव डॉ. आंबेडकर यांचा अपमान केल्या बद्दल अमित शहा वर दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा अट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करायलाच हवा! आंबेडकर हयात असते तर त्यांच्यावर देखील ED आणि CBI ची कारवाई करायला शहा यांनी मागेपुढे पाहिले नसते, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.