धरमतर ते कासा खडक हे 24 किलोमीटरचे सागरी अंतर उरणच्या आर्य पाटील या 13 वर्षीय जलतरणपटूने 5 तास 40 मिनिटांत बटरफ्लाय स्ट्रोक प्रकाराने पोहून पार केले आहे. यापूर्वी आर्यने मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया हे 21 किलोमीटर अंतर पार केले आहे.
उरण तालुक्यातील केगाव-दांडा येथे राहणारा 13 वर्षीय आर्य पाटीलने बुधवारी पहाटे 2 वाजता आर्यने धरमतर जेट्टीवरून उडी घेतली. अंग गारठून टाकणारी कडाक्याची थंडी, सागरी लाटा आणि अंधारात उतरलेल्या आर्यला मार्ग
लहानपणापासून पोहण्याची आवड दाखविण्यासाठी बोटींचा आधार होता. बटरफ्लाय स्ट्रोक पद्धतीने 24 किलोमीटर सागरी अंतर तब्बल 5 तास 40 मिनिटांत पार केले. बटरफ्लाय स्ट्रोक पद्धतीने समुद्री अंतर पार करणारा जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरणार आहे. आर्यच्या या कामगिरीची दखल इंटरनॅशनल एक्सल्ड बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये होणार असल्याचा दावा प्रशिक्षक हितेश भोईर यांनी केला आहे.
लहानपणापासूनच पोहण्याची आवड
आर्य हा खासगी शाळेत आठवीच्या वर्गात शिकतो. लहानपणापासूनच आर्यला पोहण्याची आवड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो जलतरण तलावात पोहण्याचा सराव करीत आहे. याआधी आर्यने मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया हे 21 किलोमीटर अंतर पोहून पार केले आहे. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून अनेक पारितोषिके मिळविली आहेत.