शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. डाळिंब उत्पादक शेतकऱयांना घेऊन आपण पंतप्रधानांना भेटलो, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे ही भेट झाली.

राजकीय चर्चा नाही

पंतप्रधानांसोबत कोणताही राजकीय चर्चा झाली नाही. ही भेट फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात होती. महाराष्ट्रातील दोन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधानांना भेटायचे होते. आम्ही ती भेट घेतली, अशी माहिती शरद पवार यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.