एक देश एक निवडणूक विधेयकासाठी 31 सदस्यांची जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे. समितीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे खासदार पी. पी. चौधरी असणार आहेत. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. समिती विधेयकाबाबत तज्ञांशी चर्चा करून सरकारपुढे शिफारसी मांडणार आहे.
लोकसभेत विधेयक मांडल्यानंतर आता ते मंजूर करण्याचे आव्हान मोदी सरकारपुढे असणार आहे. समितीत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, मनीष तिवारी, सुखदेव भगत, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, डीएमकेचे टी. एम. सेल्वागणपती, टीडीपीचे जीएम हरीश बालयोगी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या सुप्रिया सुळे, आरएलडीचे चंदन चौहान, जनसेना पार्टीचे बालाशोवरी बल्लभनेनी, भाजपाचे पी पी चौधरी, डॉ. सीएम रमेश, बांसुरी स्वराज, पुरुषोत्तम रुपाला, अनुराग सिंह ठाकूर, विष्णू दयाल राम, भर्तृहरि महताब, डॉ. संबित पात्रा, अनिल बलूनी, विष्णू दत्त शर्मा, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश आहे.