मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांचा तुळजापुरात काळा बुक्का फेकून निषेध करण्यात आला. ‘सदावर्ते यांचा धिक्कार असो, जाहीर निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अर्जुन साळुंखे म्हणाले की, 350 युवकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या असून त्याला सदावर्ते जबाबदार आहेत. 2013 मध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर ते आरक्षण घालवण्याचे काम सदावर्ते यांनी केले. 2019 साली 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळाल्यानंतर तेही आरक्षण घालवण्याचे काम करत असल्याने काळा बुक्का अंगावर फेकून निषेध केला.