अंतराळवीर सुनीता विल्यम्स अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अद्याप परतलेले नाहीत. तांत्रिक कारणामुळे त्यांच्या परतीस विलंब झाला. आता तर आणखी विलंब होणार असल्याचे समजते. मार्च 2025 आधी सुनीता आणि बुच पृथ्वीवर परतणार नाहीत असे नासाकडून सांगण्यात आलय. क्रू लाँचला उशीर झाल्याने दोघांची परतीची मोहीम पुढे गेली आहे. नासाने मंगळवारी याबाबतची माहिती दिली.
खरं तर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर आठ दिवसांच्या मिशनसाठी अवकाशात गेले होते. स्टारलायनरमध्ये हेलियम लीक झाल्याने आणि थ्रस्टर्समध्ये बिघाड झाल्याने अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणता आले नाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघे स्पेस स्टेशनवर थांबले आहेत आणि आपले काम करत आहेत. दोघांना परत आणण्यासाठी नासाने नव्या स्पेसएक्स क्रू ड्रगन कॅप्सूलची तयारी सुरू केली आहे. नासाकडून कामाच्या वेगापेक्षा अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. नासाचे वाणिज्य क्रू कार्यक्रमाचे प्रमुख स्टीव रिच म्हणाले, नव्या अंतराळयानाचे निर्मिती, संयोजन, परीक्षण आणि अंतिक एकीकरण ही एक अवघड प्रक्रिया आहे. त्यावर अधिक लक्ष द्यावे लागतेय. क्रू- 9 मिशनमध्ये निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांचा
समावेश आहे.
10 महिने अंतराळात
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात साधारणपणे सहा महिने मिशन चालते, मात्र सुनीता आणि विल्मोर दहा महिने अंतराळात आहेत. आता स्पेसएक्सचे क्रू-10 मिशन मार्चच्या अखेरीस लाँच होईल. त्यामध्ये नासाचे अंतराळवीर एनी मॅकक्लेन, निकोल एयर्स, रशियन अंतराळवीर किरील पेसकोव आणि जपानी अंतराळवीर ताकुया ओनिशी यांचा सहभाग आहे.