1998 मध्ये नोव्हेंबर महिन्यात आम्ही वांगणी येथे सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या उल्का वर्षावाच्या कार्यक्रमाची तयारी करायला गेलो होता. त्या वर्षी लिओनिड उल्का वर्षावासाठी अत्युत्तम (फेवरेबल) परिस्थिती होती. निरभ्र रात्री हा अवकाशी ‘वर्षाव’ विलक्षण अनुभव देणार याच्या बातम्या आम्ही वृत्तपत्रांकडे धाडल्या होत्या. प्रचंड प्रतिसाद मिळत होता. सतत चौकशीचे पह्न येत होते. साधारण तीन हजार प्रेक्षक येतील असा अंदाज धरून आम्ही आदल्या रात्री तयारी सुरू केली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास सिंह राशीच्या दिशेने नयनरम्य उल्का वर्षाव दिसू लागला. बघता बघता मोठमोठ्या फायरबॉलने (आगीन गोलक) आकाश क्षणभर उजळू लागले. त्या वर्षीच्या दिवाळीनंतर लगेच आलेली ही ‘अवकाशी’ आतषबाजी केवळ अद्वितीय होती आणि आम्ही त्या सोहळय़ाचे भाग्यवान साक्षीदार होतो!
मागच्या लेखात आपण 4 डिसेंबरला रशियात दिसलेल्या एका तेजस्वी फायरबॉलबद्दल वाचलं. उल्का पिंवा छोटे अशनी पृथ्वीच्या वातावरणात शिरताना घर्षणाने जी आग निर्माण करतात ती क्षणकाल टिकते. नंतर त्या उल्का दगडांची राख वातावरणात मिसळते. त्याचंच रोजचं वजन 48.5 टन भरतं!
मात्र काही अशनी अतिशय मोठे असतात. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर नष्ट करणारा अशनी तर महाउत्पाती होताच, पण गेल्या लाख-दोन लाख वर्षांत पृथ्वीवर ठिकठिकाणी मोठमोठी आघात विवरे निर्माण करणाऱ्या अशनीही काही कमी ‘प्रतापी’ नाहीत. सुमारे 50 ते 60 हजार वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिह्यात लोणार येथे जे अशनी आघात विवर तयार झाले आहे ते ‘बेसॉल्ट’ खडकातले एक अद्वितीय अशनी आघात विवरच आहे. त्याचं पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा खारट आहे हा तेथे भूगर्भात असलेल्या क्षारयुक्त खडकांचा परिणाम. त्याचा अशनीशी संबंध नाही.
त्या अशनीने त्याकाळी कोणाला इजा केल्याची नोंद नसली तरी पुराणकथेनुसार श्रीविष्णूने लवणासुराचा नाश केल्याचं म्हटलं जातं. आधुनिक काळात मात्र हिंदुस्थानात अशी काही नोंद आढळत नाही. त्यातुलनेत विसाव्या-एकविसाव्या शतकात रशियामध्ये अशनी आघाताच्या नि उत्पाताच्याही जास्त नोंदी आहेत. अमेरिकेतील अॅलाबामामधील अॅन होजेस यांना अवकाशी दगडाने जखमी केल्याचे पुरावे आहेत. त्याचे पह्टोही नेटवर सापडतात. त्यानंतर 2013 पर्यंत अवकाशी दगडाने माणसाला घायाळ केल्याची माहिती प्रकाशात आली नाही.
2013 मध्ये ‘चेलियाबिन्स्क’ नावाचा एक अशनी रशियातील उरल भागात 15 फेब्रुवारीला साडेनऊच्या सुमारास कोसळला. हा मोठा अवकाशी धोंडा 18 मीटर एवढा प्रचंड होता. त्याचं वजन 9100 टन होतं आणि पृथ्वीशी 18 अंशांचा कोन करत तो ताशी 69 हजार किलोमीटर वेगाने आपल्या निळय़ा ग्रहाकडे झेपावला! त्याचा ‘सूर्यापेक्षा’ तेजस्वी प्रकाश 100 किलोमीटर परिसरातून स्पष्टपणे दिसला. त्याचं हे जळजळीत रूप पाहून लाखो लोक स्तिमित झाले. अनेकांनी पह्नवर व्हिडीओ घेतले. सकाळी साडेनऊची वेळ. त्यामुळे उरल भागात माणसांचे व्यवहार सुरू झाले होते. हा पेटता महापाषाण पृथ्वीकडे येत असताना त्या भागातल्या लोकांना प्रचंड उष्णताही जाणवली.
रशियाच्या विस्तीर्ण प्रदेशात या वेळी दूरवर अजून उजाडायचं होतं. तिथे ज्यांना ‘चेलियाबिन्स्क’ मुसंडी मारताना दिसला. त्यांनी पटापट व्हिडीओ नि पह्टो घेतले. ‘दुरून डोंगर साजिरे’ तसं हे दृश्य लांबून पाहायला मनोहारी असलं तरी या ‘जळिता’चा त्रास ज्यांना झाला, त्यांना ते ‘ताप’दायकचं ठरलं. चेलियाबिन्स्क गावावरच्या आकाशात 30 किलोमीटर उंचीवर याच नावाच्या या अशनीचा जळून स्पह्ट झाला आणि त्यातून निर्माण झालेली प्रचंह धूळ व बारीक दगडांचा चुरा सुमारे 26 चौरस किलोमीटर परिसरात विखुरला. त्यातल्या विविध आकारांचे तप्त दगड लागून सुमारे 1491 माणसांना कमी-अधिक जखमा झाल्या. या अशनीच्या स्पह्टाने निर्माण केलेल्या कानठळय़ा बसवणाऱ्या ध्वनी लहरींनी सुमारे 7200 इमारतींचंही नुकसान केलं. काहींच्या काचा फुटल्या. काही घरांची छपरं उडाली आणि एकूण 3 कोटी 30 लाख डॉलरचं नुकसान झालं. तसं तर या नैसर्गिक अवकाशी विस्पह्टाने पसरवलेल्या ‘शॉक वेव्ह’ची व्याप्ती 400 ते 500 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. या अशनीने अगदी गनिमी काव्याने पृथ्वीच्या वातावरणात ‘उडी’ घेतली होती. कारण अद्ययावत निरीक्षण यंत्रांनाही त्याच्या आकस्मिक आगमनाचा सुगावा लागू शकला नाही. या अशनीने निर्माण केलेली शॉक वेव्ह (धक्का लहर) हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बने केलेल्या भयानक ‘शॉक वेव्ह’च्या 30 पट होती!
याचा अर्थ एखादा फसवा ‘निअर अर्थ’ अशनी आपल्या ‘अर्थ’ पिंवा पृथ्वीवर एका क्षणात किती अनर्थ घडवू शकतो याचा अंदाज येईल. आपल्या पृथ्वीला सतत धोक्याच्या धास्तीतच फिरावं लागतं. काही धोके नैसर्गिक अवकाशी आणि उरलेले मानवनिर्मित आत्मनाशी!
वैश्विक [email protected]