भाजपचं काम संविधान संपवण्याकडे, राहुल गांधी यांची टीका

भाजप हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीविरोधात आहेत अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली.

आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन झाली आहे, जेवढं नाव आंबेडकरांच घेता,तेवढं नाव देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता असे वादग्रस्त विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केले होते. त्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, अमित शहा हे संविधानाविरोधात आहेत. भाजपचे नेते आधीही म्हणत होते की आम्ही संविधान बदलू. भाजप हे डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या विचारसरणीविरोधात आहेत. यांचं संपूर्ण काम हे आंबेडकरांच्या विरोधात आणि संविधान संपवण्याकडे आहे हे सगळ्या देशाला माहित आहे असेही राहुल गांधी म्हणाले.