राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना बाऊन्सरकडून होणाऱ्या दमदाटीबाबतचा मुद्दा मांडत शासनाचे याकडे लक्ष वेधले. तसेच पोलिसांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करणारे बाऊन्सर आणि कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्कीचे काम सुरू आहे. गावात पोलिसांना हाताशी धरून बाउन्सरद्वारे शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांची जमीन देण्यासाठी भाग पाडत आहेत. याची गंभीर दखल घेऊन कंपनी, बाउन्सर, पोलिसांवर कारवाई करावी.
– कैलास पाटील, आमदार@PatilKailasB pic.twitter.com/BW00TslMLm
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 18, 2024
औचित्याच्या मुद्द्याद्वारे कैलास पाटील यांनी या समस्येकडे लक्ष वेधले. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्कीचे कामं सुरू आहेत. गेल्या आठवड्यात तुळजापूर येथील जवळगामेसा या गावात फ्लिमी स्टाईलने काळ्या गाड्यांमधून बाऊन्सर्सला आणण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केली. यावेळी पोलिसांनी कोणतिही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली.
गावात पोलिसांना हाताशी धरून बाउन्सरद्वारे शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांची जमीन देण्यासाठी भाग पाडत आहेत. याची गंभीर दखल घेऊन कंपनी, बाउन्सर, पोलिसांवर कारवाई करावी. काही कंपन्यांनी पोलिसांना हाताशी धरून काही बाऊन्सर नेमले आहेत. ते शेतकऱ्यांना दमदाटी करत त्यांना जबरदस्तीने जमीनी देण्यासाठी भाग पाडत आहेत. पोलीस म्हणतात त्यांच्याकडे तक्रार आली नाही. मात्र,अनेकदा पोलीस स्वतः दखल घेत कारवाई करतात. आताही पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.