संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करा; सुनील प्रभू यांची मागणी

सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवशेनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले. या झोपड्यांच्या बांधकामासाठी आरे कॉलनी येथील आरक्षित 90 एकरचा भूखंड झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी दिला होता, याबाबत अद्याप कोणतीही निविदा निघालेली नाही. ती जमीन महसूल विभागाची असल्याने, म्हाडाकडे वर्ग करणे गरजेचे आहे, शासनाने याबाबत कार्यवाही करावी, असे सुनील प्रभू यांनी म्हटले आहे.

सुनील प्रभू म्हणाले की, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमीनीवर दिडोंशी मतदारसंघातील झोपड्यांबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेण्यात आली होती. त्यात पात्र असलेल्या झोपडपट्टीधारकांना घरे देण्यात येणार आहेत. यासाठी आरे कॉलनीतील 90 एकरचा भूखंड झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी निशअचित केला आहे. या बांधकामासाठी निविदाप्रक्रिया राबवण्याची जबाबदारी म्हाडाच्या उपाध्यक्षांनी स्विकारली होती. तसेच याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतिही निविदा काढण्यात आलेली नाही. ती जमीन महसूल विभआगाची असल्याने ती आधी म्हाडाकडे वर्ग करणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने तातडीने कार्यावही करावी. तसेच पुनर्वसन होईपर्यंत आता असलेल्या झोपड्यांना वीज, पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत सुविधा पुरवाव्यात. याबाबत कार्यवाही झाली नाही, तर सरकारविरोधात न्यायालयाचा अवमानना कारवाई होईल, त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असेही सुनील प्रभू म्हणाले.