देशात नाले आणि सेप्टिक टँकमधून मैला काढणारे 67 टक्क्यांहून अधिक कामगार अनुसूचित जातीचे असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत दिली. एकूण 54 हजार 574 कामगार नॅशनल अॅक्शन फॉर मेपॅनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेअंतर्गत प्रमाणित आहेत. यापैकी 37 हजार 60 कामगार अनुसूचित जातीचे असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यात 15.73 टक्के कामगार ओबीसी असून 8.31 टक्के कामगार अनुसूचित जमातीचे तर 8.05 कामगार सर्वसामान्य कॅटेगरीतील असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबतची सरकारची आकडेवारीच त्यांनी लोकसभेत मांडली.