सोलापुरात शिवशाही बस जाळली; तीन फोडल्या, परभणी येथील घटनेचे तीव्र पडसाद

सोलापुरातील वातावरण गेल्या दोन दिवसांपासून मोर्चा, आंदोलने, निषेधाच्या घटनांनी तणावपूर्ण बनत चालले असून गेल्या 24 तासांत एक शिवशाही बस आगारातच जाळण्यात आली, तर तीन बसेस फोडण्यात आल्या आहेत. या घटनांच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोर असल्याचे सांगितले जात असून शहरातील स्थिती चिघळविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

परभणी येथील घटनेचे पडसाद सोलापुरात उमटत आहेत. विविध संघटनांकडून बंद व निषेधाचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी सोलापूरहून साताऱयाकडे जाणारी, सोलापूरहून शिवाजीनगरकडे जाणारी आणि तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱया एस.टी. बसेसवर सम्राट चौक, डीमार्ट परिसरात तुफान दगडफेक करत नुकसान करण्यात आले होते. यात तीनही बसचे प्रचंड नुकसान झाले होते.