मांत्रिकावर गोळीबार; चार जण गजाआड; पैशाचा पाऊस पाडण्यास नकार देणाऱ्या

तंत्रज्ञानाच्या युगात मंत्रोच्चारातून पैशाचा पाऊस पडू शकतो या कल्पित संकल्पनेवर आजही विश्वास ठेवला जातो याबद्दल कुणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही. पण अशीच एक घटना धुळे जिल्हय़ातील शिरपूर तालुक्यात पळासनेरच्या जंगलात 14 डिसेंबरच्या रात्री घडली. दावा करूनही मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत नसल्याने मध्य प्रदेशातील आमदार पुत्राने त्यांच्या 3 साथीदारांना सोबत घेवून मांत्रिकावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्रभर गस्त घातल्यानंतर चार संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिरपूर ताल्क्यातील बोराडी येथील सलईपाडय़ावर राहणारा मांत्रिक पैशांचा पाउस पाडतो अशी माहिती मध्य प्रदेशातील आमदाराच्या मुलाला कळली. आमदार पुत्राने आपल्या इतर तीन साथीदारांना सोबत घेऊन बोराडी येथे जाऊन पैशाचा पाऊस पाडणाऱया मांत्रिकाशी संपर्क साधला. काही दिवसांपूर्वी दोघांची भेटही झाली. पैशांचा पाऊस पाडण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपये मांत्रिकाला देण्यात आले. पौर्णिमेचा मुहूर्त साधून 14 डिसेंबरला पळासनेर येथील जंगलात पोहचले.

बराच वेळ होवूनही पैशांचा पाऊस पडत नसल्याचे लक्षात आल्यामुळे आमदार पुत्र चिडला. त्याने मांत्रिकाकडे पैसे परत देण्याची मागणी केली. पैशांचा पाऊस पडणार नसल्याचे समजल्यानंतर आमदार पुत्र चिडला. त्याने पूर्ण पैसे परत करण्याचा तगादा लावला. मात्र पैसे मिळत नसल्याचे पाहुन आमदार पुत्राचा राग अनावर झाला. त्याने मंत्रिकासह त्याच्या साथीदारावर गोळीबार केला. त्यामुळे घाबरलेल्या मांत्रिकाने स्वताःचा जीव वाचवित सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. मांत्रिकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.