अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. न्यू यॉर्कच्या एका न्यायाधीशाने सोमवारी पॉर्न स्टारला दिलेले ‘हश मनी पेमेंट’ लपविल्याबद्दल दोषी ठरवल्याच्या विरोधात तो निर्णय रद्द करण्याच्या मागणी विरोधात निकाल दिल्याचे कळते आहे, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
न्यायाधीश जुआन मर्चन यांनी सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, ‘अधिकृत कृत्यांसाठी राष्ट्राध्यक्षांना देण्यात येणारा प्रतिकारशक्ती देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या प्रकरणात लागू होणार नाही. कारण हे प्रकरण पूर्णपणे अनधिकृत वर्तनाशी संबंधित आहे.’ सीएनएनने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रानेही अशाच प्रकारचे वृत्तप्रसिद्ध केले आहे.
सोमवारच्या या निर्णयामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की, जूरींच्या निकालाविरूद्ध त्यांचे अपील प्रलंबित असताना ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये गुन्ह्यात शिक्षेसह प्रवेश करणारे पहिले अध्यक्ष बनू शकतील.
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनयलस हिला पूर्वीच्या संबंधांबाबत भाष्य करू नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पैसे दिले होते. 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यानचे हे प्रकरण आहे.