भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री दत्ताजी राणे यांचे आज पहाटे निधन झाले. भाजपचे मुंबई सरचिटणीस आणि माजी आमदार सुनील राणे यांचे ते वडील होत. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.