इस्रायल-हमास युद्धात 45 हजार मृत्यू

गेल्या 14 महिन्यांपासून इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू असून या युद्धातील मृतांचा आकडा तब्बल 45 हजारांवर गेला आहे, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांत इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात 52 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 2024 मध्ये तब्बल 104 पत्रकार आणि प्रसारमाध्यमांतील कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.