मुंबई विद्यापीठ अखिल हिंदुस्थानी स्पर्धेसाठी पात्र

नुकत्याच वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा, राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल हिंदुस्थानी आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला असून हा चमू मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे.

या महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठ महिला फुटबॉल संघाने एम.एल.एस. विद्यापीठ उदयपूर यांना 6-0ने हरवून अखिल हिंदुस्थानी स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत 45 विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या या संघामध्ये फ्लोरीन परेरा, प्रणाली भोसले, शिखा राणी भकत, ग्लिनेल पिकार्डो, रिद्धी मेहरा, बुशरा शेख, रियान डिकोना, पूजा राजपूतसह 20 खेळाडूंचा सहभाग होता.