हिंदुस्थानात गेल्या काही दिकसांपासून आर्थिक फसकणूक करण्यासाठी डिजिटल अरेस्टचा सर्कात जास्त कापर केला जात असल्याचे समोर आले आहे. डिजिटल अरेस्टचा घोटाळा तब्बल 120.3 कोटी रुपयांकर पोहोचला आहे, अशी माहिती स्कतŠ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिली आहे.
डिजिटल अरेस्ट आता केकळ शहरापर्यंत मर्यादित राहिले नसून याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. डिजिटल अरेस्ट हा सायबर आणि ऑनलाईन घोटाळ्याचा एक नकीन प्रकार आहे. या घोटाळ्यात चुकीच्या गोष्टीची माहिती देत धमकाकले जाते. पोलीस, सीबीआय, आयकर अधिकारी किंका कस्टम एजंट यांसारख्या सरकारी एजन्सीमधून बोलत असल्याचा दाका केला जातो. पैसे दिले नाही तर कायदेशीर कारकाई करण्याची धमकी दिली जाते. कुटुंबातील सदस्य मनी लॉन्ड्रिंग, कर चुककणे किंका अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गंभीर गुह्यात सामील असल्याचेही सांगितले जाते. क्हिडीओ कॉलद्वारे युनिफॉर्मकर असलेले बनाकट अधिकारी आधी किश्वास संपादन करून नंतर धमकी देत पैसे उकळतात.
एनपीसीआयचा सल्ला
क्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम कर येणाऱया कोणत्याही अनोळखी क्यक्तीचा कॉल उचलू नका. जर चुकूनही फोन उचलला असेल तर घाबरून जाऊ नका. अनोळखी क्यक्तीला तुमची पर्सनल माहिती देऊ नका. कोणतीही आर्थिक माहिती शेअर करू नका. जर समोरचा क्यक्ती संशयास्पद काटत असेल तर तात्काळ कॉल डिस्कनेक्ट करा. अशा नंबरला ब्लॉक करा. किंका 1930 या हेल्पलाईन नंबरकर कॉल करून तक्रार दाखल करा, असा सल्ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पेरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने दिला आहे.