निवडणूक आयोग ऐकून घ्यायलाच तयार नाही, काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांचा आरोप

निवडणूक आयोगाला ईव्हीएमसंदर्भात डेमो दिला तर अधिकारी ऐकून घेत नाही असा आरोप काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी केला आहे. तसेच आयोगाचे अधिकारी वाद घालतात आणि भांडण करतात असेही शुक्ला म्हणाले.

एएनायशी बोलताना शुक्ला म्हणाले की, ईव्हीएम मशीनसंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला अनेकवेळेला डेमो दिला. पण निवडणूक आयोग कुठलेच मुद्दे ऐकून घ्यायला तयार नाही. निवडणूक आयोग भांडण सुरु करतं. निवडणूक आयोगाचे अधिकारी वाद घालतात. निवडणूक आयोग कुठलीही बाब ऐकून घ्यायला तयारच नाही असेही शुक्ला म्हणाले.