नवीन वर्षाची सुरुवात होत असताना आपल्याला नवीन वर्ष कसे जाणार आहे, याची प्रत्येकाला उत्सुकता असते. नवीन वर्षात आपल्याला कोणत्या आव्हानांना आणि समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, असे प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होतात. काही भविष्यवेत्त्यांनी जगाबाबत त्यांच्या मृत्यूआधी भाकीते केलेली आहेत. त्यातील काही तज्ज्ञांची भाकिते तंतोतंत खरी ठरली आहे. अशाच भविष्यवेत्त्यांमध्ये बाबा वेन्गा यांचे नाव घेतले जाते. त्यांनी 2025 या वर्षाबाबत धक्कादायक भाकीते केली आहे.
2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी आपल्या या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. 2025 मध्ये अशा अनेक अप्रिय घटना घडू शकतात, जी जगाच्या अंताची सुरुवात असू शकते. बाबा वेन्गा यांनी 2025 या वर्षाबाबत म्हटले आहे की, या वर्षात अशा अनेक घटना घडतील, त्यामुळे मानवी जीवन हे मुळापासून बदलून जाणार आहे. या काळात युरोपमध्ये गृहयुद्ध होईल आणि त्याची परिणीती तिसऱ्या महायुद्धात होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. जगभरात राजकीय अस्थिरता निर्माण होईल. युरोपमधील अराजकता जगासाठी आणि मानवी जातीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. तसेच या वर्षात पसरणाऱ्या महामारीमुळे जगाची लोकसंख्या झपाट्यानं कमी होईल, असं भाकीतही बाबा वेन्गा यांनी केले आहे.
2025 बाबत त्यांनी एक दिलासादायकही भाकीतही केले आहे. यावर्षी कँन्सर सारख्या दुर्धर आजारावर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश येईल, यामुळे कँन्सरसारखा आजार सहजपणे बरा होऊ शकेल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. मानवाला सुरुवातीपासूनच दुसऱ्या जगाबद्दल मोठं कुतुहल आहे. एलियन्सचा शओधही सुरू आहे. एलियन्ससंदर्भातील संशोधनात मानवाला मोठं यश मिळेल. तसेची काही एलियन्स पृथ्वीवर येऊ शकतात, असेही बाबा वेन्गा यांनी भाकीत केले आहे.
बाबा वेंगा या त्यांनी केलेल्या भविष्यवाणीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही घटनांचा उल्लेख केला होता, त्या घटना त्यांच्या मृत्यूनंतर खऱ्या झाल्या असा दावा केला जातो. अमेरिकेवर झालेला 9/11 चा जो हल्ला आहे, त्यासंदर्भात देखील बाबा वेंगा यांनी आधीच सांगितलं होतं. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याचे भाकीतही त्यांनी केले होते. 2020 मध्ये कोरोनासारख्या महामारीचे त्यांचे भाकीतही खरे ठरले आहे.