समारंभाहून घरी परतत असतानाच कारची ट्रकसोबत जोरदार टक्कर होऊन अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता ही घटना घडली. मृतांमध्ये एक लहान मूल, 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
कारमध्ये एकूण 13 जण होते. सर्वजण नातेवाईकाच्या घरी एका समारंभासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना कार आणि ट्रकची धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना आधी डौंडी येथे नेण्यात आले, त्यानंतर हायर सेंटरमध्ये रेफर करण्यात आले.