महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून तब्बल 23 दिवसानंतर रविवारी राज्यातील 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यंदाच्या मंत्रीमंडळातून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर अशा जुन्या बारा खोडांना डच्चू देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे त्यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
”मी नाराज आहे, दादांसोबत कालपासून चर्चा केलेली नाही. मला ते गरजेचं वाटत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता… मला डावललं काय, फेकलं काय काय फरक पडतो. पण अशी किती मंत्रीपदं आली आणि गेली पण छगन भुजबळ संपलेला नाही’, अशी प्रतिक्रीया छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान नाराज भुजबळ हे नागपूरहून नाशिकला निघणार असल्याचे समजते. त्यामुळे भुजबळ अधिवेशनात सामील होणार नसल्याचे समजते.