झाकीर हुसेन यांचं तबलावादन संगीत क्षेत्रातील एक अविष्कार होता, आदित्य ठाकरे यांची झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली

जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

”उस्ताद झाकीर हुसेन ह्यांच्या निधनाचं वृत्त मनाला वेदना देणारं आहे. त्यांचं तबलावादन हा संगीत क्षेत्रातील एक अविष्कार होता, शास्त्रीय संगीतासाठी संजीवनी होता. हा अविष्कार प्रत्येक कलारसिक आपल्या हृदयात सदैव जपून ठेवेल! सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक उस्ताद झाकीर हुसेन ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!