शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

दादर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य आणि दिमाखदार असे राष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज या कामाची पाहणी केली व आढावा घेतला.

पहिल्या टप्प्यात बांधकाम तसेच उद्यानाचे काम केले जात आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्याची पाहणी करून आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अधिका ऱ्यांशी चर्चा केली व आवश्यक त्या सूचना केल्या. स्मारकाच्या दुस ऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाचे वैशिष्टय़ म्हणजे स्मारकाची उभारणी करण्यात येत असताना पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. त्यानुसार जुन्या महापौर निवास परिसरातील सर्व झाडांचे जतन करण्यात आले आहे.

दादर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, कला दिग्दर्शक भूपाल रामनाथकर, सुधीर नाईक उपस्थित होते.