एआय अभियंता अतुल सुभास यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी आज पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक केली. अतुल सुभाषची सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग यांना प्रयागराज येथून अटक करण्यात आली. तर पत्नी निकिता हिला गुरुग्रामममधून पकडण्यात आल्याची माहिती बंगळुरूचे पोलीस महासंचालक शिवकुमार यांनी दिली. सर्वांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
बंगळुरू पोलीस 12 डिसेंबर रोजी जौनपूरला पोहोचले होते. शुक्रवारी सकाळी पोलीस अतुल सुभाष यांच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा घराला कुलूप होते. यानंतर पथकाने दरवाजावर नोटीस चिकटवली होती. निशा, अनुराग यांना मराठहल्ली पोलीस स्टेशन, बंगळुरू येथे तपास अधिकाऱ्यांसमोर तीन दिवसांत हजर राहण्यास सांगितले होते. सासू निशा आणि मेहुणा अनुराग सिंघानिया घरातून पळून शहरातील वैभव हॉटेलमध्ये पोहोचले होते. हॉटेल व्यवस्थापकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.