रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल संचलनात विजेती
संचलन स्पर्धेत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल 95 गुण पटकावत विजेता ठरली तर उपविजेता बालाजी इंटरनॅशनल स्कूलने 85 गुण मिळवले. संचलन स्पर्धेमध्ये रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज (दहिसर), प्रज्ञा प्रबोधिनी हायस्कूल (गोरेगाव प.) सरदार वल्लभभाई पटेल शाळा (कांदिवली), संस्कार रोटरी हायस्कूल, कर्णबधिर शाळा (गोरेगाव, प.), महात्मा विद्यालय (गोरेगाव), आदर्श विद्यालय (गोरेगाव) या शाळा सहभागी झाल्या होत्या.
गोरेगाव ः 45 व्या प्रबोधन क्रीडा महोत्सवाच्या जलतरण क्रीडा प्रकारात गोरेगावच्या गोकुळधाम हायस्कूलने बाजी मारली. एपंदर या क्रीडा प्रकारात 87 शाळा सहभागी झाल्या होत्या. गोकुळधाम हायस्कूलने 78 गुण मिळवत सर्वोत्कृष्ट शाळेचा बहुमान पटकावला. ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, ओजीसी, गोरेगाव पूर्वने 58 गुणांची कमाई करत उपविजेता राहिली.
अवंतिका, उत्कर्ष उत्कृष्ट जलतरणपटू
डी. जी. खेतान, मालाड (प.) शाळेची विद्यार्थिनी अवंतिका देसाईने 6 सुवर्ण पदके पटकावली. फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या सगळय़ा प्रकारांत अवंतिकाने 42 गुणांची घसघशीत कमाई केली. तिलाच सर्वोत्तम जलतरणपटूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱया उत्कर्ष मेहताने 6 सुवर्ण पदके. 12 वर्षांखालील मुलांच्या जलतरण स्पर्धेमध्ये विबग्योर इंटरनॅशनल स्कूलच्या अबीर शेठने 33 गुणांची कमाई केली. त्याने 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावले. 16 वर्षांखालील वयोगटात नाईशी रुहील या गोकुळधामच्या विद्यार्थिनीने 20 गुण मिळवताना 4 सुवर्ण पदके काबीज केली.