Women’s Premier League 2025 मध्ये पार पडणाऱ्या हंगामासाठी रविवारी (15 डिसेंबर 2024) मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेमध्ये एकून 19 खेळाडूंची लॉट्री लागली असून एकून 9.5 कोटी रुपयांना सर्व खेळाडू विकले गेले. तसेच चार खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली असून पुढील हंगामासाठी पाचही संघांनी मोर्चेबांधणी करत आपले मजबुत संघ तयार केले आहेत.
रविवारी पार पडलेल्या मिनी लिलाव प्रक्रियेमध्ये एकून 124 खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. परंतु यापैकी फक्त 19 खेळाडूंसाठी WPL चे दरवाजे खुले झाले. सर्वच संघांनी बऱ्यापैकी खेळाडूंना यापूर्वीच रिटेन केले होते. त्यामुळे जास्त खेळाडूंवर संघांनी बोली लावली नाही. पूर्ण लिलाव प्रक्रियेमध्ये चार खेळाडू करोडपती झाले. यामध्ये तीन खेळाडू हिंदुस्थानचे असून एक खेळाडू वेस्ट इंडिजची आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानचे तिन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत. यामध्ये सिमरन शेख, जी कमलिनि आणि प्रेमा रावत या खेळाडूंचा समावेश असून सिमरन शेक WPL 2025 च्या लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. गुजरात जायंट्सने सिमरनला 1.9 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. त्याच बरोबर वेस्टइंडिजची स्टार खेळाडू डॉटिनला सुद्धा गुजराने 1.7 कोटी रुपयांना खरेदी केले. तसेच प्रेमा रावतला बंगळुरूने 1.2 कोटी रुपयांना खरेदी केली.
WPL 2025 लिलाव प्रक्रियेमध्ये मुंबई इंडियन्सने जी कमलिनिला 1.60 कोटी, संस्कृती गुप्ता 10 लाख, अक्षिता महेश्वरी 20 लाख आणि नादिन डी क्लार्क 30 लाख रुपये या खेळाडूंना खरेदी केले.
दिल्ली कॅपिटल्सने एन चरानी 55 लाख, नंदिनी कश्यप 10 लाख, सारा ब्राइस 10 लाख आणि निकी प्रसाद 10 लाख रुपये या खेळाडूंना खरेदी केले.
गुजरातने सिमरन शेख 1.90 कोटी, डिआंड्रा डॉटिन 1.70 कोटी, डॅनियल गिब्सन 30 लाख आणि प्रकाशिका नायक 10 लाख रुपये यांना खरेदी केले.
रॉयन चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रेमा रावत 1.2 कोटी, जोशिता व्हीजे 10 लाख, राघवी बिस्त 10 लाख, जाग्रवी पवार 10 लाख या खेळाडूंना खरेदी केले.
यूपी वॉरियर्स या संघाने अलाना किंग 30 लाख, अरुशी 10 लाख रुपये आणि क्रांति गौड 10 लाख रुपयांना या खेळाडूंना खरेदी केले.